माय मराठीचे मरण
संपूर्ण शिक्षण मराठीत झाल्यानंतरही माझं कधीच, कुठेच, काहीच अडलं नाही. इतरांप्रमाणे अस्खलित इंग्रजी येतही नसेल, पण म्हणून अाम्हाला कोणी अडाणी म्हणून संबोधलं नाही. एवढंच कशाला, ग्लोबल होण्यासाठी अाम्हीही पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण केलं पण त्यामध्ये कधी अाम्हाला अामची भाषा अाड अाली नाही. मग अाजच का मराठीचे वावगं वाटू लागलं अाहे लोकांना. केवळ मराठीच नव्हे तर सगळ्याच मातृभाषा अाता लयाला जाऊ लागल्यात असं वाटू लागतंय. काही दिवसांना मराठी शाळा किंवा एकूणच मातृभाषेच्या शाळा नक्कीच बंद होतील.
काही दिवसांपूर्वी विरारच्या एका प्रतिष्ठित शाळेतल्या मुख्यध्यापिकांशी माझं बोलणं झालं. जेव्हा ती शाळा सुरू झाली होती तेव्हा त्या शाळेत जवळपास एका-एका वर्गात ६०-७० विद्यार्थी असत. कधी-कधी तर इतके प्रवेश यायचे की आम्हाला त्या प्रवेश रद्द कराव्या लागयाच्या, पण अाज या शाळेची एवढी परिस्थिती वाईट झाली अाहे की अाम्हाला घराघरात जाऊन विद्यार्थ्यांना अाणावं लागतंय. ज्या ठिकाणी एका वर्गात ६०-७० विद्यार्थी होते त्याठिकाणी अाता संपूर्ण शाळेतही ६०-७० विद्यार्थी नाहीत. हे सारं त्या अगदी डोळ्यात पाणी अाणून सांगत होत्या. अाज प्रत्येक मराठी शाळेची हीच अवस्था अाहे. अाम्ही अामच्या मुलांना इंग्रजी माध्यमात नाही घातलं तर अामची मुलं ग्लोबल कशी होणार?, पुढे कशी जाणार? हाच विचार पालकांच्या मनात अाहे. पण कितीतरी मराठी माध्यमांत शिकलेली मुलं खूप पुढे गेलीत हे त्यांना कसं समजणार?. काही मराठी शाळाचं खाजगीकरण करून त्या इंग्रजी संस्थाना विकाण्याचा घाट पालिका घालतेय. शासन स्थरावरच जर मराठी शाळा बंद होण्यासाठी प्रयत्न होत असतील तर या शाळा जिवंत तरी कशा राहणार? परप्रातांत स्थायिक झालेले मराठी बांधव अापल्या मुलांना मराठी यावं याकरता धडपडतायत. त्यांच्यासाठी मराठी क्लासेस कुठे मिळतील का याचा शोध घेतायत. परप्रांतात स्थायिक झालेल्या मराठी गृहीणी या मराठी शिकवणी घेतात. यामध्ये त्यांना बक्कळ पैसाही मिळतो. पण अापल्याच देशात मराठी मरावी याकरता का धडपड केली जातेय. पाचवीतल्या एका इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलीला मी विचारलं बाई गं तुझी मातृभाषा कोणती? ती डोळे वटारुन माझ्या बघू लागली. नंतर म्हटलं अापलंच चुकलं. मी तिला इंग्रजीत विचारायला हवं होतं. व्हॉट इज युवर मदरटँग, तेव्हा ती चटकन म्हणाली, इंग्लिश. येथेच सारं संपलं. मराठी घरात जन्माला अालेली मुलगी जर मातृभाषा इंग्रजी सांगत असेल तर अाता मराठी शाळांची काहीच गरज नाही असं वाटतंय. अापल्या मुलांना ग्लोबल होण्याच्या नादात अापण अापली संस्कृती, अापली भाषा विसरतोय हे लोकांना कळत नसेल का ?
परवा ट्रेनमध्ये एक मुलगी बॅगच्या अात लपून काहीतरी करतेय असं दिसलं. मी जरा जवळ जाऊन पाहिलं तर ती मुलगी पुस्तक वाचत होती. मी तिला म्हटलं पुस्तकंच वाचतेयस ना, मग असं लपून का. तेव्हा ती म्हणाली मराठी पुस्तक अाहे ना म्हणून. दोन मिनीटं डोळ्यात पाणी अालं. म्हटंल मराठी बोलणाऱ्यांना तर लाज वाटत होती अाणि अाता मराठी वाचण्याची लोकांना लाज वाटू लागलीय. ट्रेनमध्ये वाचन करण्याऱ्या महिलांपैकी ७० ते ८० टक्के इंग्रजी पुस्तकं असंतात. पण मला कधीच मराठी पुस्तक ट्रेनमध्ये वाचण्याची लाज वाटली नाही. यापेक्षाही माझा अनुभव फार वेगळा अाहे. पु. ल. देशपांडे याचं मी व्यक्ती अाणि वल्ली हे पुस्तक वाचत असताना एक मराठी नसलेली पण मराठी वाचता येणारी मुलगी माझ्याशेजारी बसली होती. ती बहुतेक चेतन भगतचं हाल्फ गर्लफ्रेंड हे पुस्तक वाचत होती. तिचं लक्ष माझ्या पुस्तकाकडे गेलं अाणि ती तिचं पुस्तक सोडून माझं पुस्तक वाचू लागली. मराठी अाणि एकंदरीतच मातृभाषेला अापण एवढं कमी लेखतो अाहोत की अापल्याला अाता या भाषांची लाज वाटू लागलीय. छपाई यंत्राचा शोध लागल्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकर, हरिभाऊ अापटे यांच्यापासून ते कुसूमाग्रज, पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, असे कितीतरी दिग्गजांनी मराठी भाषा समृद्ध करून ठेवली अाहे.पण किती लोकांना मराठीतल्या पुस्तकांविषयी माहित असेल? असो, मातृभाषा विरूद्ध इंग्रजी भाषा हा वाद अाता काहीच दिवस होणार अाहे, कारण येत्या काही वर्षातच मातृभाषा संपून सर्वरुपी इंग्रजी भाषाच या देशात येणार अाहे. जीएसटीमुळे एक देश एक कर अशी करप्रणाली लागू झाली, त्याचप्रमाणे एक देश एक भाषा अशी संकल्पना रुजायला फार वेळ लागणार नाही. अापली मातृभाषा टिकावी, मातृभाषेतील शाळा टिकाव्या असं वाटत असेल तर अातापासूनच काहीतरी पावलं उचलायला हवीत. अजूनही वेळ गेलेली नाही. हातावर मोजण्याइतपतच मराठी शाळा राहिल्या अाहेत. त्याही नष्ट झाल्या तर भाषा जिवंत राहण्याचं साधनचं संपेल.