Tuesday, 11 July 2017

स्वप्न

उगीचंच स्वप्नांची गाठोडं बांधून अापण सैरावैरा पळत असतो. कधी स्वप्न साकार करायला तर कधी अपेक्षांच्या ओझ्याखालून वाहून जायला. कितीतरी रात्री अापण अशीच स्वप्नांची गाठोडी बांधत जागे असतो. स्वप्न किती, अपेक्षा किती कशाचा काहीच ताळमेळ नाही. जगात अालोय तर काहीतरी करून दाखवायला. पण काहीतरी म्हणजे काय हे अायुष्याच्या उत्तरार्धापर्यंतही काहींना समजत नाही तर काहीजण वयाच्या दुसऱ्या वर्षीही अापली स्वप्न साकार करतात. हाताची पाचही बोटं सारखी नसतात, मग प्रत्येकाचं नशीब सारखं कसं असेल हा विचार करत अापण पुढेपुढे जात असतो. प्रयत्न करूनही, मेहनत घेऊनही जेव्हा अापली स्वप्न स्वप्नंच राहतील असं वाटू लागतं तेव्हा अापण खचतो, मागे येतो, किंवा अाहोत तिथेच थांबतो. तिथून दुसरी स्वप्न पाहायला लागतो. अापल्याला साध्य होतील अशीच स्वप्न पाहतो.

No comments:

Post a Comment