Tuesday, 11 July 2017

एप्रिलच्या ३० तारखेला रिझल्ट लागला की आम्ही १ मे ला गावी पळायचो. तेव्हा लक्झरी बसेसची क्रेझही फार कमी होती. ट्रेन किंवा एस.टी हे दोनच पर्याय कोकणातील चाकरमन्यांसाठी असयाचे. महिनाभर गावाला राहायचं म्हणजे किती सामान घ्यावं लागायचं! एसटी एकदाची सुटली की पुढच्या महिन्याभरात काय काय करायचं याचं प्लँनिंग आखलं जायचं. त्यात भर म्हणून की काय कोणाचं लग्न असेल तर मग बच्चे कंपनीची मज्जा ठरली म्हणूनच समजा. संदेशवहनाची साधने त्याकाळी फार कमी असत त्यामुळे गावाला कोण येणार याची कल्पना नसायची. मात्र कोणाचं लग्न असेल तर काका, काकू, मामा, मामी, आत्या हे सारे येणार हे गृहीतच धरलं जायचं. गावचं घर जसजसं जवळ येत जातं तसतशी हुरहुर अधिक वाढलेली असायची. घरी जाऊन आजी आजोबांना कधी भेटतोय असं व्हायचं. कोकणातल्या काही भागात बारमाही शेती असते तर काही भागात केवळ मान्सुन शेती पाहायला मिळते. त्याचबरोबर काही भागात बारमाही नद्या वाहतानी दिसतात तर काही भागात मे महिन्यात कोरड्या नद्या असतात. आंबा, फणस, काजुगर, जांभुळ, करवंद या फळांच्या चवी चाखण्यासाठी लोक गावाला येत असतात. ही फळं मुंबईलाही मिळतात की, पण गावाची मजा ती गावालाच येणार ना. मला माझ्या लहानपणीचे दिवस अाजही आठवतात. आम्ही गावची सगळी चिल्लर कंपनी मिळून घरातले झोेपेपर्यंत पत्ते खेळत असू, एकदा का घरातले गाढ झोपले की भर उन्हात आम्ही आंबे अाणि करवंद खायाला जात असू. घरात हापूस आंब्याच्या पेट्या भरलेल्या असल्या तरी झाडावर आंबे काढून ते चोखून खाण्यात मजा काही औरच असायची. दुपार सरत आली की घरी जायचो, जर फ्रेश व्हायचो आणि पुन्हा फिरतीवर निघायचो. रोज संध्याकाळी आमची ठिकठिकाणी पिकनीक ठरलेली असायची. तेव्हा आम्ही थोडीथोडकी पोरं नव्हतो.तब्बल ४०-५० जणांचा आमचा चमू असायचा. मग आमचे दादा आणि ताईमंडळी आमच्या हुकुमत गाजवत रस्त्यावर निट चाला, गाड्या बघा वगैरेच्या सुचना द्यायचे. तेव्हाचे सारे रस्ते मातीच्या पायवाटीचे असायचे त्यामुळे त्या रस्त्यावरून चालण्याची मजा काही औरच असायची.
आता मात्र गावाची व्याख्या बदलली आहे. आपल्या माणसांमध्ये रमण्याची ओढ कमी होत जातेय. काही कार्यक्रम असेल तरच हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मंडळी जमा होतात. शिक्षण,नोकरी यामुळे काहींना येता येत नाही. शहरं जशी स्मार्ट झाली, त्याचप्रमाणे गावंही स्मार्ट झाली. शेणामातीने सारवलेलं घर, घरासमोर असणारी आंबा, फणसाची झाडं, अंगणातली तुळस, तुळशीसमोर रोज न चुकता काढली जाणारी रांगोळी, घरातल्या ओटीवर बसून मारलेल्या गप्पा आता फक्त आठवणीत उरल्या आहेत. शेणामातीची आ

No comments:

Post a Comment